मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील बाजारपेठेतील सर्वांच्या परिचयाची व सर्वदूर ख्याती असणारी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन सेवानिवृत्त पोलिस श्री निवासराव पांडूरंग कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भारतातील सर्व नागरीकानां त्यांच्या धर्म, संस्कृती, जात, लिंग आणि पंथ यांच्याशी संबंधीत समान अधिकार मिळावेत अशा पध्दतीची त्याची निर्मिती करण्यात आली.
या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी मुरगूडच्या विजयमाला गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी राष्ट्रगीत , व मानवंदना दिली.
याप्रसंगी व्यापारी नागरीचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, व्हा. चेअरमन सौ. रोहिणी तांबट, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, नामदेवराव पाटील, शशी दरेकर, हाजी धोंडीराम मकानदार, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, प्रदिप वेसणेकर, संदीप कांबळे, यशवंत परीट, प्रकाश सणगर, सुरेश जाधव, महादेव तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वृंद, नागरीक उपास्थित होते.