मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ” हुतात्मा तुकाराम भारमल ” वाचन लयात ” नेताजी सुभाषचंद्र बोस ” यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत पोलिस मा .श्री , निवास पांडूरंग कदम ( मुरगूड ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव चौगले (सर ) व माजी नगरसेवक किरण गवाणकर यांची नेताजींच्या जीवनावरील प्रसंग आपल्या भाषणात मांडले.
या कार्यक्रमावेळी संदिप वरपे, ज्ञानदेव जाधव, सौ. भारमल (वहीनी) कु. शोभा कलकुटकी, मारुती कांबळे, नगरसेवक), अॅड. खाशाबा भोसले , सुरेश मोरबाळे , रत्नापा कांबळे ‘ साप्ता. गहिनीनाथ .समाचारचे प्रतिनिधी शशी दरेकर, वाचक वर्ग, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.