स्कूलमध्ये रोबोटिक AI अभ्यासक्रमाचा होणार शुभारंभ
मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड येथील एम. जे. लकी सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशन संचलित, एम.जे.लकी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात कागल तालुक्यात प्रथमच ‘रोबोटिक AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) या अद्ययावत अभ्यासक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन जावेद माकानदार यांनी दिली.
“आपली शान – मराठी, आपला मान – मराठी” या ब्रीदवाक्याला स्मरून शाळेत महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये लेझीम, अभंग, गौळण, कोळीगीत, गोंधळ, वारकरी गीत आणि जगदंबेचा जागर अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असणार आहे.
“मराठी शिकवते संस्कृतीची गोडी, इंग्रजी देते भविष्याची जोडी” हा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार असून.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रविणसिंह विश्वनाथराव पाटील, मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील आणि उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान हाजी बाळासाहेब बाबालाल मकानदार हे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी मुरगूडमधील लोकप्रतिनिधी नूतन नगरसेवक, नगरसेविका व परिसरातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात मुरगूड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल माजी प्राचार्य महादेव कानकेकर व कोजिमाशिच्या शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनविरोध निवड झाले बद्दल अविनाश चौगले यांचा यथोचित सत्कार संपन्न होणार आहे.
शाळेने मराठी भाषेचा वारसा जपतानाच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी पाऊल उचलले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच सुरू होत असलेल्या ‘रोबोटिक AI’ अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
शुक्रवार दी.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता. एम. जे. लकी इंटरनॅशनल स्कूल, विश्रामगृहाजवळ, मुरगूड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास नागरिक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या सौ. जस्मिन जमादार, एम.जे.स्कूल परिवार व स्कूलचे सर्वेसर्वा मा. बाळासाहेब मकानदार यानी केले आहे.
