मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यामुळे मुरगूडमध्ये  पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड ( शशी दरेकर ): मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेल्या ८पैकी ६ मागण्या मंजूर झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात उत्सव साजरा होत आहे .शहरांमध्ये सकल मराठा समाज कागल आणि मुरगुड शहर परिसर नागरिक यांच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.  

Advertisements

हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातील पांच जिल्ह्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.इतरत्र सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र धारक  मराठ्यांना हा लाभ मिळणार आहे.असा शासन आदेश  काढण्यात आला. मराठा आरक्षणाचा हा लढा यशस्वी झाल्याबद्दल मुरगुडच्या शिवतीर्थावर आनंद पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .यामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

मुरगुड शहरांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलने पुकारण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा लढा निर्णायक वळणावर आल्यामुळे शहरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आल्याचे अनेकांनी बोलताना सांगितले.

Advertisements

यावेळी  मा. नगरसेवक सुहास खराडे,  सर्जेराव भाट, नामदेव भराडे,ओंकार पोतदार, संकेत भोसले,दत्तात्रय साळोखे,बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे, विजय साबळे, मारुती पुरीबुवा,आनंदा रामाने, शिवाजी चौगले,सुभाष अनावकर, विजय भोई, सुहास दरेकर, पांडुरंग मगदूम, नितीन मोरबाळे, अमर देवळे, मोहन कांबळे यांच्यासह मुरगूड मधील सर्व समाजातले बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!