![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/08/IMG-20240811-WA0074.jpg)
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली. यावेळी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना असल्याचं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेच्या आई-वडिलांचा केला सत्कार
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/08/img-20240811-wa00701012865429257594207.jpg)
केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर, “20 कोटींपेक्षा कितीही जास्त निधी लागू द्या, सरकार द्यायला तयार आहे. मात्र केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बनवा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर शाह खासबाग मैदानाची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. जुन्या वास्तूवर अशा प्रकारे गवत वाढू देवु नका अशा सूचनाही दिल्या.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/08/img-20240811-wa00713608052842678417444.jpg)
या दौऱ्यात करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत मा. आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. पाटील यांच्या रुपाने काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी अजित पवारांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराकडे प्रस्थानादरम्यान अजित पवारांनी तिळवणी येथील काही स्थानिकांची भेटही घेतली आणि उपस्थित माय-बहिणींच्या व्यथा ऐकल्या आणि त्या लवकरात कवकर सोडवण्याचं आश्वासनही दिलं.
कोल्हापूरातील श्री. रामकृष्ण हॉल, मार्केट यार्ड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी आणि बुथ कार्यकत्यांच्या मेळाव्याला त्यांनी संबोधीत केलं. त्यानंतर ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेच्या आई-वडिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला.
आकिवाट येथील अपघात दुर्घटनेत मृत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचं केलं वाटप
शिरोळ तालुक्यातील आकिवाट येथील अपघात दुर्घटनेत मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचं वाटप अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं.