कागल : कागल तालुका शैक्षणिक विद्यापीठ ओळखण्यासाठी शिष्यवृत्तीसह सर्व स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आणावा. यासाठी शिक्षकांनी नियोजनबध्द व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन डाॕ.जी.बी.कमळकर यांनी केले.
श्री.कमळकर पुढे म्हणाले करिअरच्या अनेकविध वाटा खुल्या झाल्या आहेत.यामध्ये शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेचे आवाहन पेलत प्रशासकीय सेवेत जाता येते.मात्र यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हीच बाब ओळखून आपल्या अनेकविध कार्यातून व्ही.जी.पोवार यांनी शैक्षणिक चळवळ निर्माण करत या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत कागल तालुक्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक सखाराम राजुगडे व निखिल शिंदे यांनी विविध विषयांचे मार्गदर्शन केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी डाॕ. जी. बी. कमळकर यांची शरद पवार फेलोशिप निवड समितीच्या सदस्यपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे संचालक पी.व्ही.पाटील व रमेश कदम यांनी मार्गदर्शक शिक्षकांना संबोधित केले.
या कार्यशाळेस कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व्हा. चेअरमन बाबासो बुगडे, कागल तालुका मुख्याध्यापक संघ सेक्रेटरी अशोक बुगडे, कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे संचालक एस.आर.पाटील, श्री मुल्ला सर, एस.आर.पाटील, सौ कोंडेकर मॅडम, बा.ना. चव्हाण,संजय मांडवे, बी.आर.सी. समन्वयक अंजली ढाले, सर्व मुख्याध्यापक व कागल तालुक्यातील 73 शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. टी. चौगुले यांनी केले.सूत्रसंचालन आर. व्ही. इंगवले यांनी केले तर आभार एस.के.तिकोडे यांनी मानले.