साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी

मुरगूड (शशी दरेकर) – साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो. आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखका मार्फत केले जाते आणि अंगभूत प्रतिभा शक्तिच्या जोरावर लेखकांकरवी आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तव मांडले जाते. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून नवोदित लेखकानी जीवनातील निवडक घटनांची मांडणी  साहित्यातून केली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी केले.

Advertisements

     येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाखाली आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव होडगे होते.

Advertisements

        यावेळी लेखक श्री डवरी यांनी लिहिलेल्या आणि पुणे येथील दर्या प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या  ” गावमाया ” या कथा संग्रहाची निर्मिती आणि त्या मागची प्रेरणा याबाबत सविस्तर माहिती दिली . गावमाया तील सर्व कथा सत्य घटनेवर   आधारीत दैनंदिन जीवनाच्या अनेक प्रसंगांतून घडलेल्या असून त्यांना वास्तवतेचा गाभा आहे. या कथांना वाङयीन साज चढवलेला असून त्यामुळे त्या वास्तववादी व हृदयस्पर्शी  असल्याचे  त्यांनी सांगितले. तसेच यावेळी  अधूरे स्वप्न या कथेचं कथा कथनही केलं. गाव तळ्यातील कमळाची फुले काढून विकायची , त्यातून मिळणाऱ्या पैशातून  केवळ दोन वर्षाच्या त्याच्या  चिमुरड्या मुलीला दिपावली सणासाठी  फ्रॉक विकत आणायचा हे स्वप्न उराशी बाळगत विकलाग असणारा बाप कमळाची फुले काढण्यासाठी  तळ्यात उतरतो  आणि फुले काढता काढता कमळांच्या पानाच्या मुळांमध्ये  अडकून बाप मरण पावतो आणि त्याचे स्वप्न अधूरे राहते . आगळ्या वेगळ्या शैलीतील कथा कथन ऐकूण श्रोते भाऊक झाले.

Advertisements

           यानंतर लेखकांची प्रकट मुलाखत झाली यामध्ये  प्रा. डॉ. माणिक पाटील, प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा.डाॅ. एम. ए. कोळी, प्रा. विश्वनाथ चौगले, प्रा. दिगंबर गोरे, प्रा. सोनाली कुंभार, प्रा. मनीषा पाटील, प्रा. दिपाली सामंत तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रश्नांना श्री. डवरी यांनी समर्पक उत्तरे दिली.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ शिवाजीराव होडगे यांचे अध्यक्षीय भाषण झाले ते म्हणाले की, ग्रंथ हे  आपले खरे मार्गदर्शक असतात. समाज व संस्कृती समजून घेण्यासाठी वाचन फार महत्त्वाचे असते.

तसेच प्राचीन ते अर्वाचीन साहित्याच्या वाचनाने आजचा प्रगत समाज घडलेला असून मानवी जीवनामध्ये वाचनाचे महत्त्व  फार मोठे आहे. माणूस कितीही प्रगत झाला असला तरी वाचनाचे व ग्रंथाचे महत्त्व काल,आज आणि उद्या असे त्रिकालबाधित आहे. ग्रंथपाल तानाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्देश व वाचनाचे महत्व विषद केले.

      कार्यक्रमाची सुरुवात लेखकाच्या हस्ते ग्रथ प्रदर्शनाच्या उदघाटनाने करण्यात आली सूत्रसंचालन प्रा. सुशांत पाटील यांनी केले. आभार प्रा. डाॅ. एम. ए. कोळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथालयातील सेवकवृद संजय भारमल, श्री. सदाशिव गिरीबुवा व  महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

AD1

2 thoughts on “साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा – भैरवनाथ डवरी”

  1. Wow, awesome weblog layout! How long have you been running a blog for? you made running a blog glance easy. The whole look of your web site is excellent, let alone the content material!

    Reply
  2. Good ?V I should certainly pronounce, impressed with your website. I had no trouble navigating through all the tabs and related info ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it in the least. Reasonably unusual. Is likely to appreciate it for those who add forums or anything, website theme . a tones way for your customer to communicate. Nice task..

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!