6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली.

Advertisements

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Advertisements

 या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी होवून इतरांनाही यासाठी प्रेरित करुया.. तसेच शाहू महाराजां प्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!