हुपरी: हुपरी गावाच्या बाहेरील माळी पेट्रोल पंपाजवळील इंगळी रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे कबूल केले आहे.
Advertisements
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या गावाबाहेरील ओढ्यापासून झेप घेत थेट अंबिकानगरकडील शेताच्या दिशेने गेल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Advertisements

वनविभागाला याबाबत कळविण्यात आले असून नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, तसेच सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गांव व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
AD1