सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथे शिवजयंतीनिमित्त शिवगर्जना युवा मंचच्या वतीने शिवविचार काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
शिवगर्जना युवा मंच ने आयोजित शिवविचार काल, आज आणि उद्या
यावेळी प्रमुख व्याख्यात्या विद्या भोसले बोलताना म्हणाल्या शिवरायांची कल्पकता,दुरदृष्टी, रयतेबद्दलचे प्रेम आजच्या पिढीला निश्चितच दिशा देणारा ठरेल. छ. शिवाजी आपल्या कार्यातून लोकपालक, पर्यावरण रक्षक, चांगले प्रशासक, सामाजिक क्रांती घडवणारे जाणते राजे ठरले. कार्यक्रमाच्या सुरवातीला अनिकेत पोवार यांनी प्रेरणा मंत्र सादर केला.
यावेळी समिक्षा साळोखे,संस्कृती पोवार यांची भाषणे झाली.स्वागत नयन पोवार,प्रास्ताविक डाॕ.अशोक पोवार यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लताताई पोवार या होत्या.
सुत्रसंचलन तुकाराम पोवार यांनी तर आभार सायली आगळे यांनी मानले.पन्हाळा ते सिद्धनेर्ली शिवज्योत दौड केली.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शिवगर्जना युवा मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.