संस्थेच्या कर्मचारानी संस्थेने दिलेले ठेवीचे उदिष्ठ केले पुर्ण
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची व विश्वासाची सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यानीं दिपावली पाडव्याच्या एकाच दिवशी १ कोटी७० लाख एवढ्या मोठ्या ठेवीचे संकलन केले आहे. मुरगूडमधील श्री . लक्ष्मीनारायण सह .पतसंस्था ही सभासदांच्या गरजा भागवत, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी मदत करत व सभासदांनां दिवाळीभेट वस्तूंचे वाटप करुन सभासदांच्या हिताचे कार्य करुन विश्वास संपादन करत आहे .
कोरोना काळातही या संस्थेने व कर्मचाऱ्यानी सभासदानां वेळोवेळी तप्तर सेवा देऊन माणुसकी जपली होती.
श्री. लक्ष्मीनारायण सह . पतसंस्था गेली ५६ वर्षे सभासदानां अविरतपणे सेवा देत असून सर्वच कर्मचारी वर्ग तप्तरतेने सेवा देत आहेत . त्याचीच पोचपावती म्हणून दिपावली पाडव्याच्या एकाच दिवशी १ कोटी७० लाखांचे सस्थेने दिलेले ठेविचे उदिष्ठ पुर्ण केले आहे . या मोठ्या ठेविचे उदिष्ठ पूर्ण केलेबद्दल संस्थेबरोबरच कार्यतप्तर कर्मचाऱ्याचे सर्व स्थरातून कौतूक होत आहे.