कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील सात सज्याच्या ठिकाणी कोतवाल भरती होणार आहे. या भरती बाबत दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कागल तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होणार आहे. सज्याच्या संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केले आहे.
कागल तालुक्यात कोतवाल संवर्गातील रिक्त पदे आरक्षण निहाय भरण्यात येणार आहेत. आरक्षण सोडत सज्जा व त्यातील समाविष्ट गावे अशी.. *हमीदवाडा* –हमिदवाडा मेतगे, जैन्याळ, मुगळी ,करड्याळ,*बेलेवाडी मासा*–बेलेवाडी मासा, करजीवने, हळदवडे, *कासारी*– कासारी, हसुर खुर्द ,*हसूर बुद्रुक*– हसुर बुद्रुक, मांगनूर बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, *सावर्डे बुद्रुक*– सावर्डे बुद्रुक ,पिराचीवाडी चौंडाळ ,वाळवे खुर्द, *व्हन्नूर*– -व्हन्नूर कोतवाल संवर्गातील भरतीचे आरक्षण सोडतील नागरिकांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.