मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२३ते २०२७ या सालाकरीता चेअरमनपदी श्री. किशोर विष्णुपंत पोतदार यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. दत्तात्रय गुंडू कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडप्रसंगी अध्यक्षपदी सहाय्यक निबंधकसो-श्री . समीर जांबोटकर हे होते.
या निवडीनंतर चेअरमन किशोर पोतदार गहिनीनाथ समाचारशी बोलताना म्हणाले सातत्यपूर्णपणे ऑडिट वर्ग ” अ ” प्राप्त करणाऱ्या संस्थेतर्फे गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी३१ लाखांचा विक्रमी निव्वळ नफा झाला असून संस्थेकडे ८५ कोटीवर ठेवी जमा आहेत. ५८ कोटींच्यावर कर्जवाटप करण्यात आले असून त्यापैकी सोनेतारणावर३८ कोटी इतक्या रकमेचे सुरक्षित कर्ज वितरण करण्यात आले आहे. उर्वरित रकमेची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे.
सुमारे ४०० कोटींचा व्यवहार करण्याऱ्या या संस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझ्यावर सर्वानी विश्वास दाखवून मला कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवली त्याच विश्वासाने संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीपथावर भरारी घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन .
यावेळी मावळते चेअरमन अनंत फर्नांडीस व मावळते व्हा . चेअरमन विनय पोतदार यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
या निवडीनंतर मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यानीं श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या सभागृहात जाऊनचे चेअरमन किशोर पोतदार व व्हा. चेअरमन दत्तात्रय कांबळे यांचा
पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या चेअरमन, व्हा. चेअरमन निवड प्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री. जवाहर शहा, पुंडलीक डाफळे, अनंत फर्नांडीस, संचालक सर्वश्री विनय पोतदार, दत्तात्रय तांबट, चंद्रकांत माळवदे (सर), रविंद्र खराडे, रविंद्र सणगर, संचालिका सौ. सुजाता सुतार, सौ . सुनिता शिंदे, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, व श्रीमती भारती कामत, कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर, मुरगूडच्या शाखाधिकारी सौ. मनिषा सुर्यवंशी, राजेन्द्र भोसले ( शाखा सेनापती कापशी ) , रामदास शिऊडकर (शाखा सावर्डे बु.), अनिल सणगर ( शाखा कूर ), के.डी. पाटील ( शाखा सरवडे ), अंतर्गत तपासनीस श्रीकांत खोपडे, संस्थेचे सर्व सेवक वृंद उपस्थित होते. या नूतन चेअरमन पोतदार व्हा. चेअरमन कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.