कै. दिपक वर्णे यांच्या स्मृतीदिनी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या घटकांचा सन्मान करताना मान्यवर

मुरगूड ( शशी दरेकर ) – शिक्षकांच्या ज्ञानदानातून व संस्कारातून विद्यार्थी सुसंस्कारीत होवून मोठा होतो . तेंव्हा शिक्षकही मोठा होतो .विद्यार्थ्याच्या मोठेपणातून शिक्षकांचा सन्मान वाढतो . मुरगूडमधील कवी मनाचे लेखक कै दिपक वर्णे यांच्या विचारांचा व संस्काराचा प्रकाश सर्वत्र पसरवा असे प्रतिपादन माजी प्राचार्य रामकुमार सावंत यांनी मुरगूड येथे केले .

येथील दिवंगत कवी व लेखक दिपक वर्णे यांच्या ११ व्या स्मृतीदिन कार्यक्रमात श्री सावंत बोलत होते . अध्यक्षस्थानी धरणग्रस्त नेते शिवाजीराव गुरव होते तर ज्येष्ठ पत्रकार बाळ कालेकर , मुरगूड पालिका मुख्याधिकारी ‘संदीप घार्गे ‘ पोलीस निरीक्षक ‘गजानन सरगर ‘ प्रमुख उपस्थित होते .

यावेळी शिवाजीराव गुरव यांनी माहितीचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले . प्रारंभी कैं दिपक वर्णे यांच्या प्रतिमेचे पूजन दलितमित्र डी.डी. चौगले यांच्या हस्ते करण्यात आले . कै . दिपकच्या विचारांचा व संस्काराचा प्रकाश सर्वदूर पोहचवण्याचे आवाहन करून लेखक अशोक दरेकर व सर्वोदयचे भिमराव कांबळे यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला .

स्वागत निवृत्त गट शिक्षणाधिकारी पी .आर. पाटील यांनी केले . सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वर्णे यांनी प्रास्ताविक केले . या कार्यक्रमास नंदकुमार वर्णे ‘ सदाशिव एकल ‘ छाया शिगावकर , हणमंत हावळ , सिकंदर जमादार बळीराम पाटील , किशोर पाटील , विष्णु कुंभार , भानुदास वंडकर ‘ जोतीराम सुर्यवंशी , वसंत कुंभार आदि उपस्थित होते .विनायक हावळ यांनी आभार मानले .

3 thoughts on “कै. दिपक वर्णे यांच्या विचार व संस्काराचा प्रकाश सर्वदूर पोहचवा ! –रामकुमार सावंत”
  1. It means the world to us to hear such positive feedback on our blog posts. We strive to create valuable content for our readers and it’s always encouraging to hear that it’s making an impact.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!