कागल : जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या प्रताप नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना दीपावलीचे औचित्य साधून 12 टक्के लाभांश (डिव्हीडंट) तसेच सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देखील दिला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बिपीन यशवंतराव माने यांनी दिली
यावेळी उपाध्यक्ष विजय मंत्री, व्यवस्थापक व्ही टी पाटील, संचालक सुनील माळी, संजय चितारी , संजय ठाणेकर सतीश पोवार , मुजीब मुल्ला , महेंद्र बोळके , नंदकुमार गोंधळी, सचिन कांबळे आशा काकी माने, राजश्री कचरे उपस्थित होते.
बिपीन माने पुढे म्हणाले की पतसंस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून संस्थेने सलग ऑडिट वर्ग अ’ राखला आहे. सध्या संस्थेकडे 3 कोटी रुपयांच्या ठेवी असून 1 कोटी 48 लाखाची कर्ज वाटप आहे तसेच 1 कोटी 90 लाख रुपयांची गुंतवणूकही केली आहे .गत आर्थिक वर्षात पतसंस्थेस 4 लाख 48 हजार रुपये इतका नफा झाला असून सोने तारण कर्जही उपलब्ध आहे. संस्थेने ठेवीवरील व्याजाचा दर देखील चांगला राखला आहे तसेच लहान मोठ्या गरजू लोकांना कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले असून संस्थेचा कागल शहरात चांगला नावलौकिक आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी आपला डिव्हीडंट घेऊन जाण्याचे आवाहन संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय मंत्री यांनी केले.