
कागल : कागल शहरात घेण्यात आलेल्या छत्रपती चषक प्राथमिक शालेय हॉलीबॉल स्पर्धेत नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिराने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत शहर व ग्रामीण विभागात नगरपरिषदेच्या शाळांनीच प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून कागल शहराचे नाव उंचावले आहे.
या यशामागे मुख्याधिकारी श्री अजय पाटणकर साहेबांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रेरणेने सर्व विद्यार्थी व शिक्षक या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मतीन बागवान याला प्रदान करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ, गाडेकर सर व सर्व शिक्षकवर्ग तसेच खेळाडू संघ यांच्या या यशासाठी सर्वत्र अभिनंदन होत आहे. गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिरच्या या यशाने कागल शहराचे शिक्षण क्षेत्रातले मान उंचावले आहे.