
कागल : कागल शहरात ‘हेल्थ फॉर कागल’ या उपक्रमाअंतर्गत एका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांवरील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतात. गैबी चौकातून दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. ५ किलोमीटरचा मार्ग असून तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जाईल.
मार्ग: गैबी चौक, मेन रोड, एस टी स्टँड पूल, सर्विस रोड, जयसिंगराव पार्क, फिल्टर हाऊस, श्रमिक वसाहत कमान, मोमीन मळा, स्मशानभूमी रोड, ठाकरे चौक, रिंग रोड, एस. टी. स्टँड, शिवाजी पुतळा ते गैबी चौक असा मार्ग राहील.
आयोजकांनी स्पर्धकांना काही सूचना दिल्या आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य स्वतः घेऊन यावे. ज्या नागरिकांना आरोग्यविषयक काही तक्रारी असतील, त्यांनी सहभाग घेताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
नोंदणी : स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे आणि ती निशुल्क आहे. नोंदणी केलेल्या स्पर्धकांनाच टी-शर्ट दिले जातील.
ऑनलाईन नोंदणीसाठी https://forms.gle/sXj2HMtkgk.JBgnwV8
या लिंकवर भेट द्या किंवा आरोग्य विभाग, कागल नगरपरिषद येथे संपर्क साधा. नोंदणीची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०२५ आहे.
आयोजक: सर्व प्रशासकीय अधिकारी, कागल.
दिनांक: ३ फेब्रुवारी २०२५,