नागरिकांच्या सहकार्याने यश
कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशातील १५८५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ वा क्रमांक पटकावून ३ स्टार दर्जा आणि Odf++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शहराला मिळाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शहरातील सर्व नागरिक, सर्व सेवाभावी संस्था, व्यापारी, संघटना, सर्व नगरपरिषद शाळा, हायस्कूल महाविद्यालय, पत्रकार, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, सर्व विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच या अभियानाचे नोडल अधिकारी म्हणून श्री. नितीन कांबळे आणि शहर समन्वयक म्हणून आशिष शिगवण यांनी परिश्रम घेतले. याव्यतिरिक्त मा. ना. हसनसो मुश्रीफ साहेब यांचेही अनमोल मार्गदर्शन या यशास कारणीभूत ठरले आहे.