कागल : कागल नगरपरिषदेने कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची करण्यात आलेली व्यवस्था खालील प्रमाणे आहे.
कागल नगरपरिषदे मार्फत सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३, कागल शहरातील सार्वजनिक आरोग्य राखणेसाठी तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कागल शहरातील १० प्रभागामध्ये नागरीकांना गणेश मुर्तीचे दान करण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित केलेली असुन या ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था केलेली आहे तरी शनिवार दिनांक २३/०९/२०२३ रोजी तसेच दि. २५/०९/२०२३ (सातवा दिवस) दि. २८/०९/२०२३ (दहावा दिवस) इ. रोजी सकाळ पासुन कागल शहरातील नागरिकांनी घरगुती गणेश मुर्ती कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित करून पर्यावरण संर्वधनास हातभार लावावा तसेच निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता नगरपरिषदेच्या कर्मचा-याकडे देऊन सहकार्य करावे.
- श्री. यशवंतराव घाटगे हायस्कुल पटांगण, निपाणी बेस
- नाम. हसनसो मुश्रीफ सांस्कृतिक हॉल,
- श्रमिक वसाहत काळम्मावाडी वसाहत, कागल
- संत रोहीदास विद्या मंदीर पटांगण ठाकरे चौक
- श्री. गोपाळकृष्ण विद्या मंदीर पटांगण, जयसिंगराव पार्क
- यशवंत किल्ला पटांगण, श्री. शाह हॉल गैबी चौक
- श्री. हिंदुराव घाटगे हायस्कुल पटांगण, खर्डेकर चौक
- श्री. गोपाळकृष्ण विद्यामंदीर पटांगण, आझाद चौक
- संस्कार इंग्लिश मिडीयम स्कुल, अनंत रोटो
- श्री. तु. बा. नाईक विद्या मंदीर शाहू स्टेडीयम शेजारी,
- मा. खा. सदाशिवराव मंडलिक हॉल शाहू कॉलनी
- श्री. गहिनीनाथ नगर कमानी शेजारी