कागल(सलीम शेख): कागल येथील ग्रामदैवत हजरत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुस रविवारी भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर भव्यदिव्यरीत्या सुरू झाला. यात्रास्थळी भाविकांची मोठी गर्दी उमटली.
पहिल्या दिवशी झालेल्या गलेफाच्या कार्यक्रमात हजारो भक्त उपस्थित होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, गुरूवारी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा गलेफ,पाचवा गलेफ पार पडला. या प्रत्येक दिवशी भक्तीभावाने भक्त दर्गेत दाखल होत होते.
यात्रास्थळी विविध प्रकारचे पाळणे, आकर्षक खेळणीची दुकाने, आईस्क्रीमचे गाडे आणि चवदार खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यामुळे यात्रा अधिकच रंगतदार झाली. यात्रेला हजारो भक्तांनी भेट दिली.
यात्रा निपाणी वेस-कोल्हापूर वेस मार्गावर मोठ्या प्रमाणात स्टॉल आणि पाळण्यांसह उभारण्यात आली होती. यात्रेचे आयोजन करणाऱ्या समितीने या वर्षीही भक्तांच्या सुविधांसाठी विशेष काळजी घेतली होती.
अचारसंहिता लागू असल्या कारणाने यात्रा रोज रात्री दहा वाजता बंद करण्यात आली. यामुळे नागरिकांनी व व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यापाऱ्यांची दुकाने ही पूर्वी रात्रभर चालू असत होती परंतु आचारसंहितेमुळे रात्री दहा वाजता दुकाने बंद करावी लागत होते यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तसेच यात्रेची उलाढाल कमी झाले आहे.
- मुख्य मुद्दे:
- कागल गहिनीनाथ गैबी उरुस रविवारी सुरू
- पाच दिवसांचा उरुस
- भक्तीभावाने भक्तांची मोठी गर्दी
- विविध प्रकारचे पाळणे, खेळणीची दुकाने आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल
- निपाणी वेस ते कोल्हापूर वेस मार्गावर मोठी यात्रा