मुरगूड : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व दै.सकाळचे मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना जिल्हापरिषदेच्या वतीने सन 2021 सालचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील सैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात जिल्हापरिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – 2021 (कागल तालुकास्तरीय ) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आमदार जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तिराळे यांना सपत्नीक वितरीत करण्यात आला. श्री. तिराळे हे गेली 20 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात विविध विषयांवर सडतोड लिखाण करतात.तसेच त्याचा सामाजिक कार्यात ही सातत्याने सहभाग असतो. ते कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. पुरस्कार स्विकारताना पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यासोबत कन्या कु.वेदांतिका तिराळे व पत्नी सौ.प्राजक्ता तिराळे ह्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले, समाज कल्याण समिती सभापती कोमल मिसाळ, जि.प.सदस्य युवराज पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई – शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रकाश तिराळे यांचा आज विद्यामंदिर हंबीररावनगर, कुरुकली प्राथमिक शाळेतर्फे पुरस्कार मिळालेबद्दल मुख्याध्यापक संतोष पायमल्ले यांच्या हस्ते, शिक्षक सागर डवरी, रघुनाथ कुंभार सर, मनोज बेलवळेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रकाश तिराळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Related Stories
18/12/2024