मुरगूड ( शशी दरेकर ) – देवगड निपाणी महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरू आहे . या महामार्गाच्या विस्तारासाठी शेकडो वर्ष जुनी असलेले झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली. महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात आहे. यावेळी नियमानुसार तोडण्यात आलेली झाडे लावण्यात यावी असा नियम आहे .या नियमानुसार मुरगुड येथील शिवभक्तांनी पाऊस सुरू झाल्यापासून महिनाभर त्याचा पाठपुरावा केला होता . मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली होती.
तसेच त्यांच्याकडून उद्धट उत्तरे देखील आले होते .यामुळे संतप्त शिवभक्त वृक्षप्रेमी आणि नागरिकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून झाड देऊन त्यांचा अनोखा निषेध केला . तसेच त्यांना ही झाडे लवकरात लवकर लावून घ्यावेत याबद्दल निवेदन देण्यात आले . यावेळी बोलताना वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांनी सांगितले की सध्या महामार्गामुळे शेकडो वर्षापासून ची झाडे तोडली गेली आहेत .एक झाड जगायला अनेक वर्ष लागतात मात्र मोठ्या रस्त्याच्या हव्यासापोटी अनेक झाडे याला बळी पडली आहेत.
अनेक ठिकाणी असले नियमानुसार झाड तोडल्यानंतर त्याच्याजागी एका झाडाच्या बदल्यात दोन झाडे असा नियम आहे . त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र वृक्षारोपण झाली पाहिजे . यावेळी सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार यांनी मनोगते मांडली .यावेळी कंपनीकडून टप्प्याटप्प्याने झाडे लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 300 झाडांचे रोपण करण्यात येणार आहे .सर्व आंदोलन एकत्र घेऊन या वृक्षारोपणाची प्रक्रिया राबवण्यात येईल असे सुरज कोंडेकर संपर्क अधिकारी यांनी सांगितले.
याचबरोबर कंपनीकडून संदीप पाटील मटेरियल इंजिनियर दयानंद चौगुले इंजिनियर दिग्विजय लोकरे बिलिंग इन्चार्ज तर सोमनाथ यरनाळकर, जगदीश गुरव, संग्राम डवरी विनायक ढेंगे, विनायक मुसळे, सुहास देवळे, संकेत शहा, रणजीत मोरबाळे, गोविंद मोरबाळे, संग्राम ढेरे, सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार, सुभाष अनावकर, तानाजी भराडे, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.