मुरगुड नगरपालिका नोकर सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत गोधडे तर व्हा.चेअरमनपदी विजय कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मुरगूड नगरपालिका नोकर सहकारी पत संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या नूतन संचालक  मंडळाची बैठक संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये संस्थेच्या चेअरमन पदी जयवंत ज्ञानदेव गोधडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी विजय दत्तात्रय कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक सौ. एन. एच. कांबळे होत्या.

Advertisements

चेअरमन जयवंत गोंधडे यांचे नाव विनायक रणवरे यांनी सुचवले तर राजू डवरी यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी विजय कांबळे यांचे नाव दत्तात्रय कांबळे यांनी सुचवले तर मोहन कांबळे यांनी त्याला अनुमोदन दिले. स्वागत प्रास्ताविक आणि विषय पत्रिकेचे वाचन सचिव संतोष  कुंभार यांनी केले.

Advertisements

यावेळी रणजीत निंबाळकर व ज्येष्ठ सभासद बबन बारदेस्कर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. रणजीत निंबाळकर यांनी आभार मानले.यावेळी संचालक दत्तात्रय कांबळे, सतीश कांबळे, विनायक रणवरे, राजू डवरी, कृष्णात कांबळे, महेश कांबळे, मोहन कांबळे, भिकाताई कांबळे आणि साधना कांबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!