सूळकुड (सुरेश डोणे): कोल्हापूर येथील विमल इंग्लिश हायस्कूलमध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात आला.या योग दिनाच्या निमित्ताने योगशिक्षिका जयश्री नागवेकर उपस्थित होत्या.त्यांनी विद्यार्थ्याकडून योगाची प्रात्यक्षिक करून घेतली.आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांसाठी योगा, प्राणायाम,ध्यान,धारणा महत्त्वाची आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच “करा योग…. रहा निरोग.” याचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
संस्थेच्या सचिव लिना मॅडम यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी संगीत विभागाच्या वतीने गीतांचे गायन करण्यात आले.
चेअरमन रघुनाथ घाडगे म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदृढ शरीरामध्ये निरोगी मन राहते. अनेक व्याधीवर किंवा रोगावर रामबाण औषध म्हणजे योग. नित्य योग केल्याने मनुष्य नेहमी उत्साही राहतो.
लिना मॅडम म्हणाल्या की, योगाचे महत्व फक्त अभ्यासापुरतेच मर्यादित राहिलेले नसून त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी योग महत्वाचा आहे.
१० व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने चेअरमन रघुनाथ घाडगे सर,योगशिक्षिका जयश्री नागवेकर सचिव लिना मॅडम, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय चौधरी सर यांनी केले तर आभार प्रतिक पोवार सर यांनी मानले.