
कागल / प्रतिनिधी : महीलांचे समाजातील व कुटुंबातील महत्वाचे स्थान आहे. याचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी व आपली आई, बहीण, सहकारी मैत्रीण, संसारातील महत्वाची पत्नीचं नात सांभाळणारी अर्धांगी अशा विविध भूमिका पार पाडणारी एक आदिशक्ती नारी तिच्या सन्मानसाठी महीला दिन साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या डीएड व बेड महाविद्यालयात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थीनींनी आपल्या अंगभूत कला सादर केल्या. तसेच डी.एड ची विद्यार्थीनीं स्नेहल लाड हीने शिवकालीन लाठी काठी , तसेच तलवार बाजी, भाला चालविणे ही प्रात्यक्षिके करुन रणरागिणी धाडशी महीलांचे दर्शन घडविले. व महीलांनी सबला बना असा संदेश दिला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँलेजच्या प्राचार्या लकाडे मँडम ह्या होत्या. तर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून डी.एड चे प्राचार्य जी.सी मेस्त्री सर हे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता लाड हीने केले, तर कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती आर. के पाटील मँडम व प्रा सौ घाग मँडम यांनी केले तर प्रा.आर. बी. कदम ,आर.एस. कुंभार सर, यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल माने यांचे सहकार्य लाभले तर संस्थेचे सचिव भैय्या माने यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे संचालक मा बिपिन माने व शंकर संकपाळ सर यांची प्रेरणा मिळाली या कार्यक्रमास विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.