कोळवण येथील कृषीकन्येकडून शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती

साके(सागर लोहार)- शेतकर्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूण कमी खर्चात जादा उत्पन्न घेणे काळाची गरज बनली आहे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान व मोबाईल अॅप्सची माहिती कृषी महाविद्यालय राजमाची (कर्हाड) येथील सातव्या सत्रातील कृषीकन्या त्रृतूजा पांडूरंग पाटील हिने तनांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखिवले व मार्गदर्शन केले. यावेळी शेती आधारीत प्रात्यक्षिके, जमीन व्यवस्थापन, पीक उत्पादन, माती परिक्षण नमुना कसा घ्यावा. तननियंत्रणाच्या वेगवेगळ्या पध्दतींची व जीवामृत तसेच पंचगाव्य कसे बनवावे याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. या तिला मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शिंदे, प्रा.माने, प्रा.बागल यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!