भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर – गावसकर ट्रॉफी सुरू आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 2-0 ची आघाडी घेतली आहे.
भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल माघारी परतल्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोलाचे योगदान देत 31 धावांची खेळी केली. या सामन्यात विराट कोहलीने 20 धावा केल्या.
या सामन्यात श्रेयस अय्यर 12 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी करत 31 धावा केल्या. तसेच या सामन्यात केएस भरतने 31 धावांची अप्रतिम खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.