
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडी येथे अवैध दारूभट्टी चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई काल (दि. २९ जानेवारी २०२५) सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १) महीपाल रामसिंग मेतल (वय ६०) आणि २) सतिश जनार्दन घुमाने (वय ४२) हे दोघे कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी येथे अवैध दारूभट्टी चालवत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ८०,८००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये कच्चा रसायन, तयार दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य यांचा समावेश आहे. पोलिसांनी ३३,६००/- रुपये किंमतीचे १०८० लिटर कच्चे रसायन (जमीनित पुरलेले ६ लोखंडी बरेल), २२,४००/- रुपये किंमतीचे ७२० लिटर कच्चे रसायन (आरोपींच्या घरासमोर ४ प्लास्टिक बॅरेल), १८४००/- रुपये किंमतीचे ३६० लिटर पक्के रसायन (चुलीवर मांडलेल्या २ लोखंडी बॅरेलमधील) आणि ६४००/- रुपये किंमतीची १५ लिटर गावरान ४ ॲल्युमिनियम बॅरेल( बॅरेल सारखी दिसणारे अल्युमिनियमचे भांडे) जप्त केली.

आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना दारू तयार करत होते, त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस पोलीस कॉन्स्टेबल कुंभार व रसाळ करत आहे.