मुरगूड (शशी दरेकर) : स्वतःची कार्यक्षमता ओळखून ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. हमखास यशाची जिद्द ठेवून मार्गक्रमण केल्यास मार्ग आपोआप सापडतो असे विश्वजीत बुगडे यांनी यशाचे गमक सांगितले.
येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयआयटी मधील एम. टेक. शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल विश्वजीत बुगडे यांच्या प्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य पी. डी. माने यांच्या हस्ते बुगडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी राजेश कळांद्रे व राकेश कळांद्रे यांचा बीएसएफ केंद्रीय पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तसेच वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल प्रमिला मोरे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. राजेश कळंद्रे यांनी पोलीस व सैनिक भरतीतील लेखी परीक्षेतील काही बारकावे सांगून तरुणांनी देशाच्या संरक्षण सेवेला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.
उपप्राचार्य प्रा. रवींद्र शिंदे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रचंड जिद्द, कष्टाची तयारी व आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आवाहन केले. यावेळी रंगराव कळांद्रे, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. ए. आर. काकडे, प्रा. संदिप मोहिते, अनिल दिवटे यांच्यासह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत प्रा. उदय शेटे यांनी केले तर प्रा. बी. डी. चौगुले यांनी आभार मानले.