मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे सर्वसामान्यांचे आधारवड , हरितक्रांतीचे प्रणेने , बहुजनांचे कैवारी मा . खा . स्व . सदाशिवराव मंडलिकसाहेब यानां ९१ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथम मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन विकी साळोखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे मंडलिक साहेब अमर रहे च्या घोषणानीं परिसर दणाणून गेला.

यावेळी शिवभक्त धोंडिराम परीट , गौरव मोर्चे . विशाल सुर्यवंशी , जनार्दन भाट यानीं मंडलिक साहेबांचा जीवनप्रवास उलगडत मनोगत व्यक्त केली.
मंडलिक साहेबांच्या ९१ व्या जयंती कार्यक्रम प्रसंगी सुनिल गवाणकर, आनंदराव गोरुले, अमित दरेकर, अमर कापशे, तुकाराम शिंदे, पांडूरंग सुर्यवंशी, आशिष मोर्चे, मेळगुंद पारिशवाडकर, सनी गवाणकर, पी .एस. दरेकर, अनिकेत गवाणकर यांच्यासह मंडलिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.