कागल (विक्रांत कोरे) : ऐन पावसाळ्यात गेले कित्येक दिवस झाले पावसाने दडी मारली होती. मात्र आज अचानक आकाशात ढग दाटून आले. सायंकाळपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने कागल सह परिसर ओला चिंब झाला आहे.
गेले कित्येक दिवस झाले वरून राजाने दडी मारली होती. त्यामुळे पिके करपू लागली होती. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला . आज सायंकाळ पासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सतत पडणारे पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. पिकांना पोषक असा पाऊस पडतो आहे.
पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे वेळापत्रक चांगलेच कोलमडले होते. भांगलन, कोळपण व इतरअंतर मशागतीची कामे झपाट्याने आटोपून बळीराजा वरूनराजाच्या प्रतीक्षेत होता. बळीराजा ढगाकडे एक डोळे लावून बसला होता.
वातावरणातील बदलाने नागरिक हैराण झाला होता. तापमानाचा वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. सायंकाळ पासून पावसाने दमदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले आहे. आज सर्वांना पावसाची गरज होती .बळीराजाचे म्हणणे वरूण राजाने ऐकल्याने आज पडलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. ओढ्या- नाल्याना पाणी आले आहे. पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाची अजूनही गरज असल्याचे शेतकरी राजाचे म्हणणे आहे.