
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्य मुरगूड येथिल ग्रामिण रुग्णालयातील त्यांच्या कार्याचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमात रुग्णालयातील सेविका सुप्रिया गोखले कुलकर्णी, सुरेखा कांबळे, रुपाली पाटील, रुपाली सासणे, पुनम चव्हाण, ऋतुजा पाटील, प्राची भांडवले, शितल कांबळे, यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन यानीं महिला कर्तृत्वाचा इतिहास सांगितला . तसेच संस्थापक संचालक यानीही महिला दिनाच्या औचित्याबद्ल माहिती देऊन स्त्री नारी शक्तीबद्दल मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर , व्हा . चेअरमन राजाराम कुडवे, संचालक उदयकुमार शहा, एकनाथ पोतदार, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर, आनंदा देवळे , बाळकृष्ण हावळ, आनंदा जालिमसर, दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे , शारवाधिकारी चिदंबर एकल सेवक वृंद उपस्थित होते. संचालक एकनाथ पोतदार यानी आभार मानले.