
पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द तालुका कागल या प्राथमिक शाळेत इंडोकाउन्ट फाउंडेशन मार्फत दिनांक 3 मार्च 2025 ते 5 मार्च 2025 या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार प्राथमिक औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरामध्ये डॉ अमेय सुपलेकर,करुणा कांबळे,हरिष पाटील आदी सहभागी झाले होते. इंडोकाउन्ट कंपनीचे संचालक कमल मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनचे वरीष्ट सल्लागार अमोल पाटील व कनिष्ठ सल्लागार वैभव कांबळे यांनी ह्या शिबीराचे यशस्वीपणे आयोजन केले.मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मनीषा सूर्यवंशी यांनी आभार मानले.