कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांचे कठोर निर्देश

PMEGP, CMEGP उद्दिष्टांवर भर, विशेष शिबिरांचे आयोजन होणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला विशेष आराखडा तयार करून त्याची वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाच्या विविध विषयांवरील आढावा बैठकीत ते बोलत होते.

Advertisements

यावेळी पालकमंत्र्यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) यांची उद्दिष्ट्ये वाढवण्यावर विशेष भर देण्यास सांगितले. जिल्हा उद्योग केंद्रांना मिळालेली उद्दिष्ट्ये पूर्ण करून अतिरिक्त उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी विशेष शिबिरे आयोजित करून उद्योजकांना चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Advertisements

जिल्हा उद्योग केंद्रांनी त्यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवून प्रचार व प्रसिद्धीचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. उद्योग क्लस्टरबाबत बँकांनी प्रस्ताव तयार करावेत आणि ज्या क्लस्टरना मंजुरी मिळाली आहे, ती कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे.

Advertisements

तसेच, जिल्हा उद्योग केंद्रांनी सर्व बँकांसोबत योग्य समन्वय साधून वेळेत पतपुरवठा सुनिश्चित करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही पालकमंत्री आबिटकर यांनी दिले. बैठकीला आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, लीड बँकचे मंगेश पवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!