चंद्रकांत माळवदेंच्या गोव-या आणि फुले ला ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार

२९ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये वितरण


मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल जि. कोल्हापूर  येथिल साहित्यीक श्री चंद्रकांत माळवदे लिखित गोव-या आणि फुले या आत्मचरीत्रास कोल्हापूरचा ग्रेट महाराष्ट्र साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Advertisements

येत्या रविवार  २९  डिसेंबर ला,कोल्हापूरच्या,शाहू सांस्कृतिक भवनात, प्रसिद्ध मराठी अभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते व मराठी चित्रपट दिग्दर्शक संदिप राक्षे,पत्रकार विनोद नाझरे(न्यूज आखाडा),उद्योजक पूनम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

Advertisements

साहित्य,कला,समाजकार्य, शिक्षण,अध्यात्म, संस्कृती,उद्योगक्षेत्र, महिला,युवक विकास, पर्यावरण  इ.क्षेत्रासाठी देण्यात येणा-या  विविध पुरस्कारांतर्गत ,’गोव-या आणि फुले ‘ या साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येणार असून, या पुस्तकास मिळणारा हा चौथा राज्यस्तर पुरस्कार होय.                               

Advertisements

कोल्हापूर येथील  नोंदणीकृत  समृद्धी प्रकाशन, स्वप्नपूर्ती,जिद्द,वेद फाऊंडेशन सह स्वामी एंटरप्रायझेस या सेवाभावी संस्थांतर्फे  संयुक्तरीत्या पुरस्कृत, ‘आई महालक्ष्मी संमेलन,२०२४ʼ, या कार्यक्रमाद्वारे पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती निमंत्रक मोहन गोखले व डाॅ.बी.एन.खरात यांनी ही माहीती माळवदे यानांअधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!