कोल्हापूर (सलीम शेख) : सुप्रसिद्ध गायक, संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘हम भारत के लोग’ कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे १६ भाषांमध्ये गायन करत १५० गायकांनी विश्वविक्रम केला होता. या अद्वितीय कार्यक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याच विक्रमासाठी नाईकनवरे यांना दुबई येथे १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
या जागतिक सन्मानामुळे कोल्हापूरच्या कलाविश्वात आनंदाची लाट पसरली आहे. यानिमित्ताने शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली. ही रॅली ताराराणी पुतळा, कावळा नाका येथून सुरू होऊन शाहू स्मारक भवन येथे समाप्त झाली. त्यानंतर शाहू स्मारक भवनात सदिच्छा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कबीर नाईकनवरे यांच्या ‘हम भारत के लोग’ या कार्यक्रमातून भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमात १५० गायकांनी १६ विविध भाषांमध्ये संविधानाची प्रस्तावना गाऊन इतिहास रचला. या विश्वविक्रमामुळे कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले आहे.
या विशेष कार्यक्रमात कबीर नाईकनवरे आणि सर्व विश्वविक्रमी वीरांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आला. प्रा. आनंद भोजने यांनी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व कलाकार, संघटना, सेवाभावी संस्था आणि कलाप्रेमींना सदिच्छा सभा आणि बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनेउपस्थित होते.सर्व पक्ष, संघटना, कलाकार आणि सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
“I agree with your points, very insightful!”