
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथील सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा झाला.यावेळी सर्व लहान मोठ्या कन्यांनी साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेचे संस्थापक के. डी. पाटील यांनी सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी केली. स्वाती मगदूम यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी पी. एस. पाटील होते. पाटील आपले मनोगत व्यक्त करत केले. बालिका दिनाचे महत्त्व सर्वांना सांगितले.
पहिल्या महिला शिक्षिका वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील काही प्रसंग सांगण्यात आले.स्त्रीशक्ती हीच समाज घडवू शकते त्यासाठी स्त्रियांचा आदर करावा असे म्हणाले. यासाठी लहान पणांपासून मुलींना योग्य संस्कार व योग्य शिक्षण मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. प्रिन्सिपल तेजस पटील, व्हॉइस प्रिन्सिपल निर्मला केसरकर, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, मनीषा पाटील, पूनम पाटील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
Hello my friend! I wish to say that this post is amazing, great written and come with almost all important infos. I would like to look more posts like this .