मुरगूड ( शशी दरेकर ) : दौलतवाडी ता . कागल येथे बिद्री येथिल आर्या एच.पी. गॅसचे पांडूरंग संतराम पाटील यांच्या वतीने श्रावणमासाचे औचित्य साधून व दौलतवाडीचे माजी सरपंच श्रीकांतराव भोसले यांची मोठी बहीण स्व . प्रभावती पांडूरंग पाटील यांच्या तृतिय स्मृतिदिनाच्या निमित्ताने ” ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ” भेट म्हणून वाटप करण्यात आले . स्व . प्रभावती पाटील यांचे पुत्र सतिश उर्फ राम पाटील हे आर्या एच.पी. गॅस बिद्री विभागीय प्रमुख वितरक असून मुरगूड, गारगोटी, राधानगर करवीर कार्यक्षेत्रात गॅस वितरीत करतात. त्यांचा या सांप्रदायिक हरीनाम सप्ताहात यथोचित सत्कार करण्यात आला.
या क्रार्यक्रमात मानवतेचा मंत्र जपण्यासाठी लहान , थोर , सामान्य माणूस एकत्र येऊन हरीनाम सप्ताहात सहभागी होतानां दिसतो आहे हे कौतुकास्पद चित्र सध्या आपल्याला पहायला मिळत आहे.
दौलतवाडी येथे माजी सरपंच श्रीकांतराव भोसले, जेष्ठ वारकरी रमेशमामा जाधव, पांडूरंग भोसले, दत्तात्रय भोसले, प्रकाश सुर्यवंशी, एम, एम. चौगले, वारकरी मंडळी व नागरीकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
बिद्री व मुदाळ येथेही मंदीरात या ग्रंथांचे वाटप करण्यात आले .
बिद्री येथे बाजीराव जितकर , श्रीकांत पाटील , विलास लोहार , विश्वनाथ डफळे , एम्.एम. चौगले , राहुल लोहार , विलास पोवार तर मुदाळ येथे अनिल पाटील , सागर पाटील , शांताराम पाटील, वारकरी व नागरीक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.