बातमी

काँग्रेसच्या विजयात कागल मधून  घाटगे पिता-पुत्रांचे लिड

पहिल्यांदा पांठिबा देवून शेवटपर्यंत प्रचारात उठवले रान

व्हनाळी (वार्ताहर) : लोकसभेचे कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना या निवडणूकीत कागल तालुक्य़ातून उदंड प्रतिसाद लाभला. शाहू महाराजांच्या प्रचारादरम्यान बैठका, पदयात्रा आणि जाहिर सभांना झालेली प्रचंड गर्दी आणि विरोधात तालुक्यातील विद्यमान खासदार उमेदवार असूनही त्यांच्या विरोधात उघड- उगड बोलणारे सामान्य लोक यामुळे वैचारीक लढाईत सुद्धा शाहू महाराजांची सरशी कायमच अबादीत राहिली. तीन प्रमुख गट विरोधात असताना सुद्धा संजयबाबा घाटगे व अंबरिषसिंह घाटगे या पिता-पुत्रांनी  इतर सहकार्यांच्या मदतीने केलेला उठाव काँग्रेस  च्या विजयात कागल मधून  ‘लिड’ देणारा ठरला व  शाहू महाराजांना विजयाप्रत घेवून गेला. संजयबाबा घाटगेंनी शाहू महाराजांना पाठिंबा जाहिर करून  शेवटपर्यंत प्रचाराचे रान उठवले  यामुळे त्यांचा विजय हा दिड लाख मताधिक्यांनी झाला. कागल च्या राजकीय विद्य़ापिठात शाहू महाराजांनाच लोकांनी पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट दिसले आहे.  भविष्यात या निकालामुळे पुन्हा एकदा संजयबाबा घाटगे गटाला उभारी मिळणार आहे.  

         शाहू महाराज यांची कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर होताच  संजयबाबा घाटगे यांनी आघाडी धर्म आणि शाहू महाराजांवरील निष्ठा व त्यांचे पिढ्यान पिढ्यांचे कार्य विचारात घेवून तातडीने आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावून शाहू महाराजांना पाठींबा जाहिर केला.  उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी  शाहू महाराजांचा प्रचार तळागळापर्यंत पोहचवला. त्यामुळेच विरोधात तीन गट असून देखील महाराजांना यश मिळवता आले. गावावातील भेटीगाठी सभा,पदयात्रेच्या माध्यमातून घाटगे यांनी केंद्रातील भाजप सरकार किती फसवे आहे,भ्रष्टाचारी,म्हागाई,बेरोजगारी असे अनेक मुद्दे उदाहरणासहीत पटवून दिले. सगळ्य़ात महत्वाचे म्हणजे विद्यमान खासदार किती निष्क्रीय़ आहेत हे वास्तव पटवून देण्यात ते यशस्वी झाले. 

https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघानुसार महाविकास आघाडीतील शाहू महाराजांचे पारडे कागलमध्ये  सुरूवातीला कमी वाटत होते कारण विरोधी उमेदवार हा स्थानिक आहे परंतू सर्वच घटकांनी तसेच शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या पाठबळामुळे योग्य नियोजन केल्यामुळेच कागल तालुक्यातून सुद्धा शाहू महाराजांना चांगले मताधिक्य मिळाले. सत्ता संपत्ती व आमिशाना बळी न पडता कागल मधील सूज्ञ मतदारांनी निर्भिड पणे मतदान केल्याने  कागल मधील तीनही महायुतीच्या नेत्यांचे मतदान घटले आणि छ्त्रपती शाहू महाराज विजयी झाले.   या सर्व घडामोडीत माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शाहू महारांजांच्या विजयासाठी जावीचे रान केले यवढ मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *