मुरगूड ( शशी दरेकर ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून बदली झाली आहे.
Advertisements
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. डॉ. गणपती कमळकर यांनी यापूर्वी कागल येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करून आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा ऊमटवला होता. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ठाणे महापालिकेतील प्रशासन अधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे प्रशासन अधिकारी म्हणून बदली केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मो.बा. ताशिलदार यांनी नुकतेच या बदलीचे आदेश काढले आहेत.
Advertisements
