कागल(प्रतिनिधी) : येथील गहिनीनाथ गैबी पीर चरणी उरूसा निमित्त मानाचा चौथा गलेफ कागल सिनियर घाटगे घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी अर्पण केला. कागल येथील उरूसाचा आज मुख्य दिवस आहे. चौथा गलेफ हा मोठा म्हणून ओळखला जातो. त्याचा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात हा गलेफ अर्पण केला. यावेळी राजपरिवारातील श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे, आदी मान्यवर उपस्थित होते.