मुरगूड ( शशी दरेकर ) : गाडगेबाबांचे किर्तन हे राजेरजवाडयांसाठी नव्हते, तर ते सामान्य माणसांच्या प्रबोधनासाठी होते . असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले ते वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने आयोजित गाडगेबाबा पुण्यदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भारतीय राजस्व सेवा उपायुक्त कुलदिपराजे कुंभार हे होते. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ . कुंभार पुढे म्हणाले , कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन एकच होते . ते म्हणजे बहुजन समाजाचा उद्धार होय . गाडगेबाबांनी आपल्या किर्तन प्रवचनातून अंधश्रद्धेवर आघात करत समाजाला डोळस बनवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ. रंजना मंडालिक, दतामामा खराडे, नगरसेवक सुहास खराडे, माजी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, बहुजन जनजागृती संस्थेचे एम. टी. सामंत, शिवराजचे प्राचार्य बी आर बुगडे, कार्यवाह आण्णासो थोरवत, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल पाटील, ज्येष्ठ नागरीक संघाचे सदाशिव एकल शिल्पकार एमडी रावण नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी वृद्धाश्रम चालक विमलताई सुतार वनश्री रोपवाटीका संचालिका निता सुर्यवंशी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातील कृतिशील उपक्रमाचा भाग म्हणून समाजातील कष्टकरी ज्येष्ठांचा सन्मानपत्र, शाल व मानाचा फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक केलेला सत्कार ज्यामध्ये . श्रीमती शारुबाई गणू लाड ( वय ८३ जुन्या काळातील आचारीन ), श्री शंकर विठू एकल ( वय ७५ – कष्टकरी शेतकरी ), गणपती गोपाळ गोधडे (वय ८३ – टेलरिंग व्यवसाय वर्षे ६४ ) मालती मधुकर सुर्यवंशी (वय हॉटेल व्यावसायिक) वसंतराव आंबले ( वय ७५ सायकल बाशिंगे तोरणे दुकानदार ) सुरेश गणपती कांबळे बाळू महादेव कांबळे अरुण दतात्रय कांबळे अजीत आब्बास मेहतर (सर्व सेवा निवृत आरोग्य विभाग कर्मचारी मुरगूड नगरपरिषद ) आदीचा समावेश होता.
जो शरिर कष्ट करीत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही . मी काम केल्या शिवाय विना कष्टाचे कांही खाणार नाही गाडगे बाबांचे विचार हाच आचार धर्म !
यावेळी निराधार निराधार निराश्रीतांना ब्लँकेट वाटप तसेच वंदूर येथील वृध्दसेवाश्रमास धान्य व जिवनोपयोगी वस्तूचे वाटप करणेत आले. या प्रसंगी राजवर्धन मोहिते या चिमुकल्याने गाडगे बाबांचे विचार आपल्या गोड वाणीत मांडले . आणि श्रोत्यांकडून वाहवाह मिळवली .
वनश्री रोपवाटीकेतून रोपं दिली जात नसून झाड जगवण्याचे बळ दिले जाते प्रविण सुर्यवंशी यांचा हा उपक्रम स्तुत्य असून तो सर्वत्र पोहचला पाहिजे हे कार्य म्हणजेच खरा धर्म आहे.
यावेळी भाऊसो खाटांगळे राजेंद्र शिंदे, सखाराम सावर्डेकर, शिरसेकर विष्णू खाटांगळे, भीमराव कांबळे, ओमकार कांबळे, पापा जमादार, धोंडीराम परीट, यशवंत परीट, प्रदिप वर्णे, सचिन सुतार, गुरुकूलम शिक्षण संस्थेचा स्टाफ आदींसह शिवराज हरीत सेनेचे विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. स्वागत विकास सावंत प्रास्ताविक प्रविण सूर्यवंशी सुत्रसंचालन प्रतिक्षा पाटील तर आभार संदीप मुसळे यांनी मानले.