
कागल तालुका महिला गर्भाशय मुख कर्करोग मुक्त! मंत्री मुश्रीफ यांच्या मोफत HPV लसीकरण कार्यक्रमामुळे महिलांना मोठा दिलासा
कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पासून मुक्तता व्हावी व महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रात कागल तालुक्यात प्रथम HPV लसीकरण कार्यक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे ही महागडी लस हसन मुश्रीफ फौंडेशन मार्फत मोफत उपलब्ध करून दिली आहे. गोरगरीबांसाठी सतत झटणा-या मंत्री मुश्रीफ यांचे हे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार पं.स.कागलचे माजी सभापती रमेश तोडकर यांनी काढले.
वि.मं.लिंगनूर दुमाला येथे वयोगट 9 ते 26 मधील मुलींसाठी आयोजित HPV लसीकरण मोहीम कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी सरपंच श्रीमती छाया कुंभार या होत्या.
याप्रसंगी उपसरपंच मधुकर मोरबाळे, माजी सरपंच भगवान बुजरे, दत्तात्रय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष विनायक कांबळे, ग्रा. पं.सदस्य अमोल हवलदार, महेश बारड, माजी उपसरपंच वसंत शेलार, पोलीस पाटील सुनील कुंभार आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, मुख्याध्यापक सदानंद यादव सर, CHO कल्पना गायकवाड पालक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.