दसरा चौक येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश सुरु

कोल्हापूर, दि. 14 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक, कोल्हापूर या वसतिगृहात समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत प्रवेश देण्यात येत आहे. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह दसरा चौक, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल एम.एन.जगताप यांनी केले आहे.

Advertisements

शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण व इयत्ता 11 वी मध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छुक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा, निवास व भोजन पुरविण्यात येत असल्याचेही गृहपाल श्री. जगताप यांनी कळविले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!