कागल पंचायत समिती येथे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आणि जीवनदायी सीपीआर प्रशिक्षण

कागल (एस.  सणगर) : १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी कागल पंचायत समितीमध्ये प्रशासक आणि गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या आनंदात पार पडले. या सोहळ्याला पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Advertisements

ध्वजारोहणानंतर, उपस्थितांनी एकत्रितपणे हुतात्मा स्मारकाचे पूजन करून महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि राज्याच्या विकासातील शहीदांना आदराने स्मरण केले.

Advertisements

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी एक अत्यंत महत्त्वाचे प्रशिक्षण आयोजित केले. त्यांनी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंना सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले. हृदयविकाराचा झटका किंवा श्वास थांबल्यास तातडीने काय करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देसाई यांनी सीपीआरच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि कर्मचाऱ्यांनीही या प्रात्यक्षिकामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

Advertisements

या महत्त्वपूर्ण प्रसंगी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद तारळकर, बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झालेल्या या ध्वजारोहण आणि सीपीआर प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक नवीन उत्साह संचारला असून, सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!