गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्कार

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिल्यांदा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या टी. जे. मगदूम यांचा आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील (वस्ताद) यांच्यासह पत्रकार सलीम शेख, नानक सिंग, प्रशांत पाटील, शहाजी गायकवाड, राजू शिंदे, जीवन सरवळकर, तानाजी मोरे आणि सुभाष भोसले पत्रकार यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी वृक्ष देऊन सत्कार केला.

Advertisements

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मखदूम यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता पाटील (वस्ताद) यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल भाषण केले आणि मगदूम यांच्या नियुक्तीला ऐतिहासिक पाऊल मानले. टी.जे.मगदूम यांनी या आधी  ईस्पूर्ली पोलीस ठाणे येथे नियुक्त होत्या.

Advertisements

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:
* गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिल्यांदा महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक
* टी जे मखदूम यांचा सत्कार
* राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील (वस्ताद) यांच्यासह सर्व पदाधिकार्यांचा सहभाग
* वृक्ष देऊन सत्कार
* महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल भाषण

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!