केनवडे ‘अन्नपुर्णा’ शुगर येथे आदर्श पत्रकारांचा गौरव
व्हनाळी( वार्ताहर) : कौटुंबिक, सामाजिक व कार्यालयीन तणावाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. या परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून केलेली पत्रकारिता समाजासाठी निश्चित दिशादर्शक ठरेल. पत्रकारितेला कायदेशिर बाबींच्या संरक्षण कवचाची पूवीर्पेक्षा आज अधिक गरज असून पत्रकारिता टिकली तर लोकशाही टिकेल. पत्रकारांनी वृत्तसंकलन करताना कधीही कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी पडी नये. समाजाचे सजग प्रहरी होवून वृत्तपत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजाचे दर्पण झाले पाहिजे. निर्भीड पत्रकारिता हि काळाची गरज आहे, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्याच बरोबर समाजातील उपेक्षित लोकांना न्याय देण्याचे काम पत्रकार चांगल्या प्रकारे करतात असे प्रतिपादन ‘अन्नपुर्णा’ शुगरचे चे संस्थापक चेअरमन मा.आम.संजयबाबा घाटगे यांनी केले.
केनवडे ता.कागल येथे अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखाना कार्यस्थाळवर आयोजित आदर्श पत्रकारांच्या गैारव समारंभात ते बोलत होते. प्रमुख उपस्थीत संजयगांधी निराधार समितीचे मा.अध्यक्ष धनराज घाटगे होते.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहिर झालेबद्दल दैनिक तरूण भारत चे पत्रकार सदाशिव आंबोशे,सकाळचे रमेश पाटील व उपस्थीत सर्व पत्रकार बांधवांचा चेअरमन संजयबाबा घाटगे, धनराज घाटगे, दतोपंत वालावलकर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भास्कर चंदनशिवे, एन.एस.पाटील, जाहांगिर शेख, सदाशिव आंबोशे यांनी पत्रकारांच्या अडचणी व आजची पत्रकारीता याबद्दल उपस्थीत पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पत्रकार कृष्णात कोरे, नंदकुमार कांबळे, नरेंद्र बोते, तानाजी पाटील, इम्रान मकानदार, एकनाथ पाटील, दतात्रय पाटील , कृष्णात शेटके, विक्रांत कोरे, सम्राट सणगर उपस्थीत होते.
स्वागत सागर लोहार यांनी केले तर आभार राजेंद्र काशिद यांनी मानले.