मडिलगे (जोतिराम पोवार) : गेली पाच दिवस भक्तिमय वातावरणात सुरूअसलेल्या गणरायाला आज भक्तिमय वातावरणात पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात वाघापूर ,कूर,मडिलगे, गंगापूर व परिसरातून गणरायाला निरोप देण्यात आला कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याहीवर्षी गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी गणेश तरुण मंडळ माळवाडी व भोईराज तरुण मंडळ वाघापूर यांनी विसर्जन मिरवणुकीला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन केले यावेळी येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पाणी प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व मूर्ती दान करण्यास आवाहन करण्यात आले होते या उपक्रमास नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी तीन ट्रॉली निर्माल्य तसेच गणेश मूर्ती एकत्र करण्यात आल्या यावेळी सरपंच दिलीप कुरडे, उपसरपंच सौ शुभांगी कांबळे ग्रामसेवक तानाजी शिंदे, सचिव दयानंद कांबळे, जीवन तोरसे, अरुण कांबळे, प्रल्हाद कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
Related Stories
18/12/2024