मुरगुड येथे सडलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह सापडल्याने खळबळ : घातपाताचा संशय

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड- चिमगाव रस्त्यालगत  बागेच्या ओढयाजवळील शेतातील ऊसाच्या सरीत सडलेल्या अवस्थेत बेवारस पुरुषाचा मृतदेह उताणा स्थितीत सापडला.  या प्रकाराने आज शहरात खळबळ माजली. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे. हा घातपाताचा  प्रकार असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisements

       पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,  मुरगूड – चिमगाव  बागेच्या रस्त्यालगत ओढ्याजवळील संदेश म्हेतर यांच्या ऊसाच्या शेतातील एका सरीत ३५ ते ४० वयोगटातील बेवारस पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आज दुपारी आढळून आला. शेतकरी म्हेतर हे ऊसपीकाला लागवड घालण्यासाठी गेले असता ऊसातील सरीत हा मृतदेह दिसून येताच त्यांनी याची वर्दी मुरगूड पोलीसात दिली.

Advertisements

       पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व  जागेवरच डॉक्टरांना बोलावून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली व मृतदेह जमीनीत दफन केला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची परिसरात दुर्गंधी सुटली होती.

Advertisements

         अनोळखी पुरुष हा अंगाने मध्यम,  पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जिन पॅन्ट त्यावर मागील बाजूस AAJ कंपनीचे लेबल असलेले, CRAZE कंपनीची निळ्या रंगांची अंडरवेअर, उजव्या हाताच्या मनगटाला तसेच उजव्या पायास घोट्याजवळ काळा धागा बांधलेला, छातीवर उजव्या बाजूस MANU असे इंग्रजीमध्ये गोंदलेले अशा वर्णनाची व्यक्ती कोणाच्या परिचयाची असेल तर मुरगूड पोलीसासी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!