मुरगुड ( शशी दरेकर ) – ज्येष्ठांनी आरोग्य संपन्न जीवन जगून शतायुषी व्हावे व समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करावा. ज्येष्ठांना आमच्या पोलीस खात्याचे सदैव सहकार्य राहील असे विचार मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यक्त केले.
येथील ज्येष्ठ नागरिक संघास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस खात्यामार्फत ज्येष्ठांना दीपावलीचा फराळ वितरित करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रारंभी खजानिस शिवाजी सातवेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाच्या कार्याची व नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रियांका वाकळे व त्यांचे सहकारी तसेच संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम, सचिव सखाराम सावर्डेकर संघाचे संचालक व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य पी डी माने यांनी केले तर आभार संचालक अशोक डवरी यांनी मानले.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.